गुरुवार, नवंबर 10, 2005

मराठी ब्लॉग विश्व

मी माझा पहिला ब्लॉग दिड वर्षापुर्वी लिहिला. त्यानंतर फारशी प्रगती नाही ती गोष्ट वेगळी. काही दिवसांपुर्वी सहज कुठलीतरी साईट बघताना माझ्या ब्लॉगची लिंक सापडल्यावर खुप आश्चर्य वाटले. मी सोडुन माझा ब्लॉग कुणी वाचला असेल असे मला वाटलेही नव्हते. जरा सर्च केल्यावर सगळ्या मराठी ब्लॉग्सची लिस्ट असलेल्या २-३ साईट्स सापडल्या. बरेच मराठी ब्लॉग्स पाहुन फार आनंद झाला. या सर्व साईटमधिल सर्वात आवडलेली साईट म्हणजे 'मराठी ब्लॉग विश्व'. या साईटचे वैशिष्ठ्य म्हणजे कुठल्याही ब्लॉगवर झालेले ताजे लिखाण येथे सारांशरुपात बघायला मिळते. तसेच ब्लॉगसूचीमधील वर्गीकरणही छान आहे. उ. दा. संपुर्ण देवनागरी, रोमन लिपीतील, काही अंशी देवनागरी, चित्ररुपात मराठी इत्यादी.

हा स्तुत्य उपक्रमात सहभागी असणार्या सर्वांचे आभार.

परत एकदा या साईटची लिंक: http://www.marathiblogs.net/

शनिवार, नवंबर 05, 2005

मी भेट दिलेली अमेरीकेतील राज्ये

अमेरीकेत आल्यापासून मी या १६ राज्यांना भेट दिली आहे. शक्य झाल्यास सर्व ५० राज्यांना भेट देण्याचा मानस आहे.

रविवार, अक्‍तूबर 30, 2005

शिकागो शहर


सीअर्स टावर्सवरुन काढलेला शिकागो शहराचा फोटो.

शुक्रवार, सितंबर 23, 2005

गेटवे आर्च

मागील आठवड्यात आम्ही मिझोरी राज्यातील सेंट लुईस शहराला भेट दिली. येथील प्रसिद्ध जागा म्हणजे 'गेटवे आर्च'. मिसिसीपी नदीच्या तीरावर सेंट लुईस डाउनटाउन मध्ये ही वास्तु आहे. १९६३ साली बांधलेली ही वास्तु संपुर्णपणे पोलादी असुन याची उंची ६३० फूट आहे. अमेरिकेचा मिसिसीपी नदीच्या पश्चिमेस विकास करण्यात मोलाची कामगिरी बजावणार्या साहसवीरांचे स्मारक म्हणून ही वास्तु बांधण्यात आली. या कमानीच्या आतून ट्राम गाड्यात बसून वरपर्यंत जाता येते. या ट्रामगाड्या जत्रेमधील मोठ्या गोल चक्राच्या तत्वावर चालतात. कमानीच्या सर्वात वरील भागात Obeservation Gallery असून तेथून सेंट लुईस शहर आणि परिसराचे विहंगम द्रुष्य दिसते. आम्ही एका बाजूने वर जाऊन दुसर्या बाजूने खाली आलो. या कमानीच्या खाली या स्मारकासंबंधी चित्रपट दाखवण्याची व्यवस्था व संग्रहालयही आहे.

या कमानीचे काही फोटो..



कमानीची सावली

रविवार, जून 19, 2005

देवनागरीत परत लिहिण्यास सुरुवात करण्याचा प्रयत्न!! बघु आता किती दिवस उत्साह टिकतो ते!!

मंगलवार, अप्रैल 27, 2004

मराठी गुगल

गुगल! बघावे तर एक input box आणी दोन बटणे अशी साधीसरळ सुट्सुटीत असलेली साईट. पण हिच साईट आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन बसली आहे. तांत्रिक माहिती असो वा आपल्या आवडत्या नटीबद्दलचे gossip, दोन सेकंदात योग्य माहिती आपल्या हातात हजर. गुगलने मराठी, हिंदी, हिब्रु अशा अनंत भाषांमध्ये interface बनविल्याचे काही दिवसापुर्वीच पाहिले होते पण त्यात काही मजा वाटेना. फ़क्त screen वर दिसणारया शब्दांचा मराठी अनुवाद बाकी सुविधा त्याच अशीच त्याची ओळख. पण त्यातील खरी गम्मत Unicode शी ओळख झाल्यावरच कळली. Unicode मुळे केवळ इंग्रजीच नाही तर Unicode वापरुन लिहीलेले शब्दही शोधता येतात. उ. दा. मराठी ह्या शब्दासाठीचे निकाल

आता ही युनिकोड ही काय भानगड आहे ते उद्या!!

सोमवार, अप्रैल 26, 2004

पहीलं पान

मायबोलीवर थोडेफार देवनागरी लिहिले जाते. पण अजितने दिलेली विकीपिडीया ही साईट पाहताना आपणही Unicode मध्ये देवनागरीत साईट बनवावी ह्या बरेच दिवसापासुन मनात असलेली इच्छा उफाळुन आली. इंटरनेटवरुन काही utilities download करुन पाहिल्या पण कुठली पसंत पडेना. पण प्रियांक थत्ते याने सुचविलेली बराहा ही utility अगदी पाहीजे तशी निघाली. यात इंग्रजी आणी देवनागरी keyboards switch करणे अतिशय सोपे आहे.

आता रोज मनात येईल ते, वाट्टेल ते थोडेफार लिहिण्याचा मानस आहे! विषय काहिही!! मनाला येईल तो!! आपण अधुन मधुन भेट द्याल आणी ही साईट आपले थोडेफार मनोरंजन करेल अशी आशा करतो !!